चाळीतून कांदा चोरणार्‍या तिघांना पकडले

jalgaon-digital
2 Min Read

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

सामोडे येथून शेतातील कांदा चाळ मधून कांदा चोरतांना तीन चोरट्यांना रंगेहात पकडले व एकजण फरार झाला आहे.

पिकअ‍ॅप गाडीसह कांदा असा तीन लाख,चार हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

सामोडे येथील शेतकरी किरण सीताराम घरटे यांच्या सामोडे शिवारातील शेताजवळ कांद्याची चाळ असून त्यात कांदे भरलेले होते.

दि. 26 ऑक्टोबर रोजी रात्री 2 वाजता योगेश घरटे हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना कांद्याच्या शेड जवळ एक पिकअप गाडी उभी असलेली दिसली, जवळ जाऊन पाहिले तिथे तीन-चार व्यक्ती कांदे भरताना दिसून आले.

शेतकर्‍याला पाहतातच त्या व्यक्तींनी वाहन सुरू करून ते म्हसदी गावाकडे निघाले. योगेश घरटे यांनी किरण घरटे यांना फोन करून माहिती दिली.

त्यांची चौकशी केली असता गाडीत शेडमधील कांदा आढळून आला सदर व्यक्तींना गाडीसह पिंपळनेर पोलिस स्टेशनला आणून पोलिसांच्या ताब्यात दिले, तेथे त्यांनी मनोज रघुनाथ भागवत गोंदे, संदीप बाजीराव सोनवणे, किरण बाजीराव सोनवणे असे नावे सांगितले. संजय चैत्राम गावित रा. गुंजाळ ता. साक्री हा फरार झाला आहे. या चौघांविरूध्द पिंपळनेर पोलिसात भादंवि 379,34,511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यात वापरलेली व्हॅन 3 लाख रुपये, 50 किलो कांदे अंदाजे किंमत चार हजार पाचशे रुपये, प्लास्टिकच्या टोपल्या तीनशे रुपये असा एकुण तीन लाख 4 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *