Friday, April 26, 2024
Homeधुळेपिंपळनेरला गॅस सिलिंडरने घेतला पेट

पिंपळनेरला गॅस सिलिंडरने घेतला पेट

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

येथील बाजारपेठेत उल्हास बागूल यांच्या घरात गॅस सिलिंडरला रेग्युलेटर लावतांना गळतीमुळे सिलींडरने पेट घेतला व

- Advertisement -

किचनला आग लागली मात्र स्थानिक नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्य ललित चौरे यांनी केलेल्या मदतीने वेळीच आग आटोक्यात आली. यामुळे वित्त व जीवित हानी टळली.

उल्हास दिलीप बागुल यांच्या घरात ते स्वतः नवीन सिलिंडर लावतांना गळती लागली व रबरी नळीने पेट घेतला. यामुळे किचनमध्ये आग पसरली.

तसेच किचन मधील इलेक्ट्रिक बोर्ड व वायर यांनाही ही आग लागली. नागरिकांनी पाणी व फायर फायटरने आग आग आटोक्यात आणली.

तसेच इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला यामुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले व पुढील अनर्थ टळला. अन्यथा संपूर्ण बाजारपेठेतील घरांनी पेठ घेतला असता.

- Advertisment -

ताज्या बातम्या