लाचखोर सहाय्यक अभियंता गजाआड

jalgaon-digital
1 Min Read

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

पिंपळनेर वीज वितरणाचे सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी याला घरगुती वापरासाठी नवीन मिटर देण्यासाठी….

चार हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्या विरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळनेर येथे राहणार्‍या 43 वर्षीय व्यक्तीला घरगुती नवीन मिटर वीज वितरण कंपनीकडून घेण्यासाठी अर्ज केला होता.

परंतू नवीन मिटर देण्यासाठी पिंपळनेर वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी (वय51) याने तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेवून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. त्यावेळी संजय माळी हा चार हजाराची लाच घेतांना आढळून आला.

त्याला पथकाने अटक केली आहे. सदर कारवाई संदीप सरग, सुधीर सोनवणे, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडिले, भूषण थेटे यांच्या पथकाने केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *