Friday, April 26, 2024
Homeनगरपिंपळगाव माळवी येथील वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

पिंपळगाव माळवी येथील वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) पिंपळगाव माळवी (Pimpalgav Malvi) येथील पंपिंग स्टेशन (Pumping Station) व श्वान निर्बीजीकरण केंद्राच्या (Dog sterilization Center) परिसरातील 126 झाडे चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. बाबासाहेब रामभाऊ शिंदे, रामभाऊ लक्ष्मण शिंदे, विलास रामभाऊ शिंदे व इतर व्यक्ती (सर्व रा. पिंपळगांव माळवी ता. नगर) अशी गुन्हा दाखल (Filed a crime) झालेल्यांची नावे आहेत. महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन (Municipal Corporation Garden Department Head Shashikant Najan) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

पंम्पिंग स्टेशन व श्वान निर्बीजीकरण केंद्राच्या परिसरात असलेली लिंबाची 24, गोडी बाभुळ 95, शिरिष 6, आंबा 1 अशी 126 झाडे चोरून नेण्यात आली आहेत. 17 मे रोजी सकाळी गोरक्षनाथ भाऊसाहेब आढाव (रा. पिंपळगाव माळवी) यांनी पिंपळगांव माळवी येथे महापालिकेच्या मालकीची झाडे बाबासाहेब रामभाऊ शिंदे, रामभाऊ लक्ष्मण शिंदे, विलास रामभाऊ शिंदे व इतर व्यक्तींनी यापूर्वी झाडांची चोरी करुन विकले असून, आता ते वृक्षतोड करत असल्याची माहिती नजन यांना दिली.

त्यांनी उद्यान विभागाचे कर्मचारी विजय बबन कुलाळ, गणेश शंकर दाणी यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तीन जण वृक्षतोड करत होते. सदर जागा ही आमच्या मालकीची आहे, त्यामुळे शेती करण्यास आम्हाला झाडांचा अडथळा होत असल्याने आम्ही झाडे तोडत आहोत, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी जागेतील अनेक झाडे तोडून, चोरून नेल्याचे निदर्शनास आल्यावर मनपा वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य तुळशीराम पन्नालाल पालीवाल, सुरेश सोपानराव खामकर व उद्यान विभागाने गोरक्षनाथ भाऊसाहेब आढाव, राम तुकाराम गुंड, गोरक्षनाथ तुकाराम गुंड (सर्व रा. पिंपळगाव माळवी) यांच्या समक्ष पंचनामा केला. त्यानंतर मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार नजान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार झाडांची चोरी करणे व झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या