Saturday, April 27, 2024
Homeनगरपिंपळगाव माळवी येथे 126 वृक्षांची तोड

पिंपळगाव माळवी येथे 126 वृक्षांची तोड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या जागेत करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा पंचनामा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तेथील 126 वृक्षांची तोड करण्यात आली असून, याप्रकरणी महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेची पिंपळगाव माळवी येथे 700 एकर जागा आहे. या तलावाजवळील क्षेत्रात हजारो झाडे आहेत. मागील काही दिवसात या ठिकाणची अनेक झाडे तोडून नेण्यात आली. या झाडांच्या लाकडाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी मागील पाच ते सहा दिवस वृक्षतोड झालेल्या ठिकाणी पंचनामा केला.

सदर ठिकाणी 126 झाडे तोडून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार उद्यान विभागाकडून अहवाल तयार करण्यात आला आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार येत्या दोन दिवसात याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नजान यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार

शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी या प्रकरणी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पुन्हा असा प्रकार होऊ नये, यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ही तक्रार करण्यात आल्याचे गाडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या