Saturday, April 27, 2024
Homeनाशिकएका दिवसातच पिंपळगाव शहर बससेवा बंद

एका दिवसातच पिंपळगाव शहर बससेवा बंद

पिंपळगाव बसवंत । वार्ताहर | Pimpalgaon Baswant

नाशिक महानगर पालिकेने (Nashik Municipal Corporation) मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant ) ते नाशिक शहर बस सेवा (Nashik city bus service) अवघ्या एका दिवसातच बंद केल्याने विद्यार्थी (students) व प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

- Advertisement -

परिवहन महामंडळाच्या (Transport Corporation) बस कर्मचारी संपामुळे गेल्या चार महिन्यांपासून बससेवा बंद (Bus service) असल्याने नाशिक (nashik) येथे ये-जा करण्यासाठी प्रवाशांंना महामार्गावर तासन्तास उभे रहावे लागत होते. तर शाळा (schools), महाविद्यालयीन (college) विद्यार्थ्यांना देखील नानाविध समस्यांचा सामना करावा लागत होता. येथील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहर बससेवा सुरू करण्याबाबत नाशिक मनपा कडे पाठपुरावा केल्याने अखेरीस काल सोमवार दि.21 रोजी सकाळी 8 वाजता सी.एन.जी बससेवेचा प्रारंभ करण्यात आला.

पहिल्या सी.एन.जी बसचे पूजन करून पिंपळगाव शहरातून या बसची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दर तासाला सी.एन.जी बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र पी.एन.जी टोल (PNG Toll) वे चे घोडे मधेच अडले अन् ही बससेवा रात्री बंद झाल्याची घोषणा मनपाने केली. परिणामी प्रवाशांच्या आनंदावर विजरण पडले.

त्याचे असे झाले मनपा सी.एन.जी बसला (CNG bus) बससेवेचा 650 रु. टोल भरावा लागत असल्याने ‘भीक नको पण कुत्रं आवर’ याप्रमाणे ही बससेवा बंद करण्याचा निर्णय नाशिक मनपाने (Nashik Municipal Corporation) घेतला. त्यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू झालेली बससेवा त्याच दिवशी सायंकाळी बंद झाल्याने प्रवाशी, विद्यार्थी, चाकरमानी यांचेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पिंपळगाव ही व्यापारी बाजारपेठ म्हणून अवघ्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. साहजिकच येथे येणारे व्यापारी, ग्राहक, व्यवसायिक यांचा या बाजारपेठेत नित्याचा राबता असतो.

शेतकरी देखील आपला शेतमाल येथे मोठ्या प्रमाणात आणतात. पिंपळगाव येथे परिवहन महामंडळाचे बस आगार असून बस कर्मचार्‍यांच्या संपामुळे बसगाड्यांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून नाशिक शहर बससेवेचा पर्याय समोर आला होता. त्यादृष्टीने ही बससेवा कालपासून सुरू देखील झाली.

दिवसभर या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र पी.एन.जी टोल कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे या बससेवेला मोठ्या प्रमाणात टोलची रक्कम द्यावी लागत असल्याने नाशिक मनपा ने इच्छा असूनही केवळ मनपा बससेवा तोट्यात जावू नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवून नव्याने सुरू झालेली पिंपळगाव बसवंत-नाशिक ही शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी लागलीच सुरू केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या