Friday, April 26, 2024
Homeनाशिकपेठ, सुरगाणा तालुक्यात ‘कुपोषण मुक्ती'चा पायलट प्रोजेक्ट

पेठ, सुरगाणा तालुक्यात ‘कुपोषण मुक्ती’चा पायलट प्रोजेक्ट

नाशिकरोड | Nashikroad

नंदुरबार जिल्ह्याचे (Nadurbar District) धर्तीवर विभागातील सर्व आदिवासी बहुल भागात (Tribal Area) आरोग्य विभाग (Health Department) व महिला व बालविकास विभागाने (Child Development) एकत्रित 0-6 वयोगटातील जास्त अतितीव्र कुपोषित बालके (Severely malnourished children) (SAM) व अधिक मध्यम तीव्र कुपोषित बालकांची (MAM) शोध मोहिम राबविण्यात यावी.

- Advertisement -

जेणेकरुन या मोहिमेमुळे सॅम व मॅम बालकांची योग्य आकडेवारी समोर येण्यास मदत होऊन बालकांसाठी योग्य त्या उपाययोजना करणे शक्य होईल.

तसेच नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पेठ व सुरगाणा (Peth, Surgana) या आदिवासी तालुक्यात ‘कुपोषण मुक्तीचा’ पायलट प्रोजेक्ट (Pailot Project) लवकरच राबविण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Game) यांनी सांगितले आहे.

आज विभागीय आयुक्त कार्यालयातील (Divisional Commissiooner Office) नियोजन सभागृहात विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP CEO) यांची विविध विषयांचा अनुषंगाने दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते.

यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक येथून नाशिक जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, जळगांव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, सहायक आयुक्त प्रतिभा संगमनेरे, सहायक आयुक्त मनिष सांगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पी.डी.भामरे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, सर्व जिल्ह्यांनी शोध मोहिमेसंदर्भात सूक्ष्म नियोजन करुन या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच या मोहिमेच्या संनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी (District Level Nodal Officer) यांच्या नियुक्ती करुन मोहिम सुरु करण्यापूर्वी तालुकास्तरावरील पथकातील वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) व कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकावरी व बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे.

याबरोबरच बालकांची आरोग्य तपासणी (Child Health Check up) तसेच किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी व लसीकरण मोहिम (Vaccination Campaign) राबविण्यात यावी, अशा सूचना यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या