Wednesday, April 24, 2024
Homeनगररानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

बालाजी देडगाव |वार्ताहर|Balaji Dedgav

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे एका शेतकर्‍यावर रानडुकराने हल्ला करण्याची घटना घडली असून

- Advertisement -

या घटनेत बापू दाविद हिवाळे हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देडगाव येथील बापू हिवाळे आपल्या शेतात काम करत असताना तेथे अचानक आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला जबर जखम झाली.

रानडुकराने हल्ला करताच बापू यांनी आरडाओरड केल्याने त्यांचे बंधू योसेफ हिवाळे व परिसरातील शेतकरी धावत आले. परंतु तोपर्यंत रानडुकराने तेथून धूम ठोकली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बापू हिवाळे यांना उपचारासाठी कुकाणा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक चंद्रकांत गाढे, वन विभागाचे कर्मचारी सयाजी मोरे यांनी सर्वप्रथम या हल्ल्यात जखमी झालेल्या बापू हिवाळे यांची दवाखान्यात जावून भेट घेतली. त्यानंतर घटनास्थळी जात पंचनामा केला.

घटनास्थळी त्यांना रानडुकरच्या पायाचे ठसे आढळले. यावेळी योसेफ हिवाळे, सागर हिवाळे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, वल्लभ दहातोंडे, बाजीराव हिवाळे आदी उपस्थित होते. वनरक्षक गाढे यांनी या परिसरात पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या