Friday, April 26, 2024
Homeनगरनेवासा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी यांची नियुक्ती

नेवासा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी यांची नियुक्ती

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

रिक्त असलेल्या नेवासा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियंत्रण कक्षातील निरीक्षक विजय करे यांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

नेवाशासह राजुर, भिंगार, एमआयडीसी पोलीस ठाणे निरीक्षकांच्या बदली बाबतचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी रात्री काढले. बदली झालेल्या ठिकाणी हजर होऊन तत्काल पदभार स्वीकारण्याचे आदेश अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांची बदली राजुर पोलीस ठाण्याच्या रिक्त पदावर करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांची बदली भिंगार पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी करण्यात आली आहे.

भिंगारचे निरीक्षक प्रवीण पाटील यांना मागील आठवड्यात निलंबित करण्यात आले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक विजय करे यांची काही दिवसांपूर्वीच नागपूर येथून जिल्ह्यात बदली झाली होती. नेवाशाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची नियंत्रण कक्षात बदली झाल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांची तीन महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर हे पद रिक्त होते.

या रिक्त पदावर आता निरीक्षक करे यांची बदली करण्यात आली आहे. भिंगार पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील यांच्यावर खूनाच्या गुन्ह्यातील तपास कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले होते. या रिक्त पदावर एलसीबीचे सहाय्यक निरीक्षक देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या