Friday, April 26, 2024
Homeनगरनिष्काळजीपणाने फिरणार्‍यांवर कडक कारवाई करणार - पोलीस निरीक्षक करे

निष्काळजीपणाने फिरणार्‍यांवर कडक कारवाई करणार – पोलीस निरीक्षक करे

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

शहरातील कोविड परिस्थितीची आढावा बैठक काल नेवासा पोलीस ठाण्याच्या आवारात पार पडली.

- Advertisement -

निष्काळजीपणाने फिरणार्‍यांवर कडक कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिला.

पोलीस निरीक्षक विजय करे यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांनी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. फिल्डवर काम करताना कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाईल तसेच नागरिकांनी निष्काळजीपणाने गावात फिरू नये कायद्याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार असे या वेळी करे म्हणाले.

यावेळी संजय सुखदान, अल्ताफ पठाण, आसिफ पठाण, सचिन नागपुरे, सचिन वडागळे, राजेंद्र मापारी, संदीप बेहळे, रणजित सोनवणे, नेवासा पोलीस ठाणे व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या