Wednesday, April 24, 2024
Homeनगरनवीन पोलीस निरीक्षक येण्याच्या भितीने संगमनेरातील कत्तलखाने बंद

नवीन पोलीस निरीक्षक येण्याच्या भितीने संगमनेरातील कत्तलखाने बंद

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

शेकडो वेळा कारवाया करूनही संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखाने खुलेआम सुरुच असतात.

- Advertisement -

मात्र शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची बदली होऊन नविन पोलीस निरीक्षक येणार असल्याच्या धास्तीने संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखाने बंद ठेवण्यात आले आहेत.

राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, कोल्हेवाडी रोड, जुना जोर्वे नाका आदी परिसरात कत्तलखाने राजरोसपणे चालतात. शहरातील कत्तलखाना चालकांची दादागिरी वाढत चालली असून आता काही तडीपार गुंडही या व्यवसायात उतरले असल्याची माहिती उपलब्ध झाली.

कत्तलखाना चालकांबाबत तक्रारी करूनही पोलीस याबाबत कारवाई करताना दिसत नव्हते. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागेवर नविन पोलीस निरीक्षकांची नेमणूक होणार असल्याने धास्तावलेल्या कत्तलखाना चालकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. या कत्तलखाना चालकांना नविन येणार्‍या अधिकार्‍यांचा एवढा धाक आत्ताच का लागला? त्यामुळे संगमनेरातील कत्तलखाने येत्या चार-पाच दिवसांपासून कडकडीत बंद असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या