Friday, April 26, 2024
Homeनगरबहिरट, डेरे यांची तडकाफडकी बदली

बहिरट, डेरे यांची तडकाफडकी बदली

श्रीरामपूर, नेवासा |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट आणि नेवाशाचे पीआय रणजित डेरे यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली

- Advertisement -

असून त्यांच्या जागी अनुक्रमे प्रशिक्षक आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी आणि अभिनव त्यागी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बहिरट तसेच डेरे यांच्या तडकाफडकी बदलीची सर्वत्र चर्चा सुरू होती.

नुकताच गुटखा छापा प्रकरणातील मुख्य आरोपींच्या तपासात अपयश आले. तसेच चार पाच दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरात मटका सर्रासपणे चालू असल्यामुळे नाशिक पोलीस महासंचालकांच्या पथकाने श्रीरामपुरात येऊन अनेक ठिकाणी छापा टाकला. तसेच काल बेलापूरात खोटा गुन्हा दाखल केला म्हणून बेलापूरात आंदोलन झाले. या प्रकरणात वरिष्ठ पोलिसांच्या सांगण्यावरुन एका आरोपीचे नाव फिर्यादीतून काढून त्याला सोडून देण्यात आले.

ते प्रकरणही त्यांच्या अंगलट आले. असे चार पाच प्रकरणामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली असावी अशी चर्चा सुरु होती. त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी आयुष नोपाण हे आज मंगळवार दि. 27 ऑक्टोबरपासून कार्यभार स्विकारणार आहेत. पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट तसेच रणजित डेरे यांची बदली नगर येथे कंट्रोलला करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या