Wednesday, April 24, 2024
Homeनगरविवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल

विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल

कोपरगांव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील देर्डेे चांदवड येथे गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, तुला भूतबाधा झाली आहे अशा असंख्य कारणावरून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. घराच्यामागे हातपाय धुण्यासाठी गेली होती ती मिळुन आली नाही. परंतु त्याच ठिकाणी असलेल्या तळ्यात तिचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या वडिलांनी हुंड्यासाठी बळी घेतला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकणी 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

माझी मुलगी गायत्री महेश त्रिभूवन हिचे व तिचे सासुचे घरातील कामावरून किरकोळ वाद झाला होता. परंतु ते नेहमी माझ्या मुलीला काही ना काही कारणावरून त्रास देत होते. त्याबाबत माझ्या मुलीने मला सांगीतले होते. माझी मुलगी गायत्री हीला भुतबाधा झाली आहे. म्हणुन तिला काल शहापुर येथे मांत्रीक नामे गवळी याच्याकडे तिचे सासु सासरे घेवून गेले होते. तसेच सासरकडील मंडळी लग्न झालेपासुन आम्हाला मोटारसायकल घ्यायची आहे. त्यासाठी तुझ्या बापाकडुन हुंड्यापोटी एक लाख रुपये आण अशी मागणी मुलीला करत होते. मात्र आज दि. 4 मे रोजी स. 7 वा. माझे मेहुणे नवनाथ हरीभाऊ राधे यांना मुलीच्या सासूने फोनवर काळविले की, तुमची मुलगी गायत्री सकाळी झाडलोट करताना दिसली त्यानंतर ती परत दिसली नाही. बेपत्ता झाली आहे असे तिने कळविले त्यानंतर मी, मेहुणा व इतर नातेवाईक असे मुलीच्या गावी देर्डे चांदवड येथे गेलो.

मुलगी घराच्यामागे हातपाय धुण्यासाठी गेली होती म्हणून आम्ही तळ्यावर जावून तिचा शोध घेतला. ती मिळुन आली नाही. म्हणून आम्ही पोलीस स्टेशन येथे येवून माझी मुलगी बेपत्ता झालेबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर आम्ही मुलीचा शोष घेणेसाठी मुलीचे घराचे पाठिमागे असलेल्या तळ्यात लोकांचे मदतीने पाण्यात शोध घेतला त्या तळ्याचे पाण्यात मुलगी गायत्री हिचा मृतदेह मिळुन आला. तिचे अंगावर साडी नव्हती फक्त परकर व ब्लाऊज होते. व हातात बांगड्या भरलेल्या होत्या मी मुलीचे सासरचे लोकांना मोटार सायकल घेण्यासाठी त्यांना एक लाख रुपये दिले नाहीत म्हणुन पती महेश दिलीप त्रिभुवन, सासरे दिलीप पूंजा त्रिभुवन, भाया सुरेश दिलीप त्रिभुवन, सासु मिराबाई दिलीप त्रिभुवन, जाऊ मोनिका सुरेश त्रिभुवन सर्व रा. देर्डे चांदवड ता. कोपरगाव यांनी वेळोवेळी तिचा शारीरीक व मानसीक छळ केला आहे. व त्रास दिला आहे. व त्यांनी तिचा हुड्यासाठी बळी घेतला आहे. तसेच माझे मुलीला भुतबाधा झाली आहे. असे म्हणून तिला त्रास दिलेला आहे त्यातच गायत्रीचा मृतदेह तळ्याचे पाण्यात मिळून आले आहे.

याप्रकरणी बाळासाहेब पंडीतराव खरात (वय 47) (रा. पिंपळवाडी, ता. राहाता) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी पती महेश दिलीप त्रिभुवन, सासरे दिलीप पूंजा त्रिभुवन, भाया सुरेश दिलीप त्रिभुवन, सासु मिराबाई दिलीप त्रिभुवन, जाऊ मोनिका सुरेश त्रिभुवन अश्या पाच जणांविरुद्ध भादंवि कलम 498 (अ), 304 (ब), 34 प्रमाणे कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या