फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीकडे तीन लाख रूपयांची खंडणी मागितली. भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी पीडित युवतीने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली विधाटे (मुळ रा. नांदुर ता. आष्टी जि. बीड) व रोहिणी रावसाहेब गवळी (रा. कापुरवाडी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 21 डिसेंबर, 2021 ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलवर फोन केला व म्हणाले,‘तुझ्या सोबत काढलेले फोटो व्हायरल करू, फोटो व्हायरल करायचे नसल्यास तीन लाख रूपये द्यावे लागतील’, असे म्हणत खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार देत आरोपींचे मोबाईल नंबर ब्लॉक केली.

आरोपींनी फिर्यादीच्या होणार्‍या पतीसह मित्राच्या मोबाईलवर फोटो टाकून बदनामी करत धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक बी. पी. गायकवाड करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *