Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रफोन टॅपिंग प्रकरणी रश्मि शुक्लांना मोठा दिलासा; सीबीआयने न्यायालयात दाखल केला 'हा'...

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मि शुक्लांना मोठा दिलासा; सीबीआयने न्यायालयात दाखल केला ‘हा’ रिपोर्ट

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणारे फोन टॅपिंग प्रकरण (Phone Tapping Case) आता पूर्णपणे बंद झाले आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट (CBI Filled Clouser Report) न्यायालयाने स्वीकारला आहे.

- Advertisement -

२०१९ मध्ये रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख पदी विराजमान होत्या. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील नेत्यांचे रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

Mizoram bridge collapsed : बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला; १७ मजूर ठार, अनेकजण दबल्याची भीती

या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जबाब देखील नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने केलेल आरोप सिद्ध होत नसल्याचे सांगितले आणि सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिला. न्यायालयात सीबीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार फोन टॅपिंग प्रकरण पूर्णपणे बंद झाले आहे.

मार्च २०२१ मध्ये विरोधी पक्षनेते पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी टॅपिंग संदर्भात आरोप केले होते. तसेच सरकारचा डेटा विरोधी पक्षांकडे कसा गेला हा आरोप केला होता. यावर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करण्यात आली होती.

चांद्रयान-३ साठी आजचाच दिवस का निवडला? इस्रोच्या शास्रज्ञांनी सांगितले कारण

यात रश्मी शुक्ला आणि तत्कालीन डीजी सुबोध जायसवाल यांना दिली होती आणि ही सर्वाचे डॉक्युमेंट फडणवीसाकडे कसे आले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले, मात्र आता या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला आहे. आता हे प्रकरण कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या