Saturday, April 27, 2024
Homeनगरपीएच.डीधारक प्राथमिक शिक्षक होणार विस्तार अधिकारी ?

पीएच.डीधारक प्राथमिक शिक्षक होणार विस्तार अधिकारी ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील पीएचडीधारक शिक्षकांना (PHD Teacher) शालेय शिक्षण विभागाच्या रिक्त असणार्‍या वर्ग 1 (Class 1), वर्ग 2 (Class 2) आणि विस्तार अधिकारी पदावर नियुक्त्या (Appointments) देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत विधानसभा सदस्य संभाजी पाटील निलंगेकर (MLA Sambhaji Patil Nilagekar) यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला असून याबाबत ग्रामविकास विभागाने (Rural Development) राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी या विषयाची माहिती मागविली आहे. यामुळे राज्यातील पीएच.डी धारक (Ph.D holder) प्राथमिक शिक्षकांच्या शालेय शिक्षण विभागात अधिकारी होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

- Advertisement -

ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी उल्हास कावरे (Ulhas Kaware) यांनी याबाबत नुकतेच पत्र काढून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त (Divisional Commissioners in the State) यांच्याकडून माहिती मागविली आहे. कावरे यांच्या पत्रात विधानसभेचे सदस्य संभाजी पाटील निलंगेकर (MLA Sambhaji Patil Nilagekar) यांनी विधानसभेत तारांकित प्रश्‍न क्रमांक उपस्थित केला आहे. यात राज्यात वर्ग-1 (Class 1) व वर्ग-2 (Class 2) तसेच विस्तार अधिकारी (शिक्षण) ही प्रशासकीय पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदावर जिल्हा परिषदेत (ZP) सेवेत कार्यरत पीएच.डी धारक शिक्षकांना वर्ग-1 व वर्ग-2, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी या रिक्तपदी नियुक्ती करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांनी शिक्षण मंत्री (Education Minister) यांच्याकडे जुलै, 2020 मध्ये वा त्या दरम्यान केली होती.

त्यावर शिक्षण विभागाने (Department of Education) कोणती कार्यवाही केली करण्यात येत आहे. तसेच कार्यवाही केली नसल्यास त्याच्या विलंबाची कारणे काय आहेत? याबाबतची सर्व मुद्यांची माहिती प्रश्‍नोत्तर स्वरुपात सविस्तर टिप्पणीसह सादर करण्याची सुचना राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहे. ग्रामविकास विभागाने (Rural Development) याबाबत माहिती मागविल्याने आणि विधानसभेत (Legislative Assembly) याबाबत तारांकित प्रश्‍न उपस्थितीत झाल्याने राज्यातील पीएच.डी धारक प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षण विभागात वर्ग 1, वर्ग 2 आणि विस्तार अधिकारी होण्याचे स्वप्त पूर्ण होणार आहे.

वर्ग 1 आणि वर्ग 2 या प्रशासकीय पदावर नियुक्तीसाठी एपीएसपीच्या परीक्षेव्दारे तर विस्तार अधिकारी शिक्षण यापदासाठी खाते अंतर्गत अथवा थेट परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यात येते. विस्तार अधिकारी पदाच्या खाते अंजर्गत परीक्षांना बीएड् अथवा एमएड झालेल्या पद्वीधर आणि किमान तीन वर्षाचा अनुभव असणार्‍या शिक्षकांना बसता येते. मात्र, बीएड अथवा एमएड झालेल्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता ही शिक्षण शिकविण्याच्या पध्दतीची आहे. तर पीएच. डी झालेल्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता ही संशोधन पध्दतीच्या पुढे गेलेली असते. एका विशिष्ट विषयात त्यांनी संशोधन केलेले असल्याने ते विस्तार अधिकारी अथवा वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या पदावर पात्र ठरू शकतात.

मागील अधिवेशात या विषयावर चर्चा होवून राज्यभरातून पीएच. डी झालेल्या प्राथमिक शिक्षकांची माहिती मागविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वर्षभरात काहीही कार्यावाही झालेली नव्हती यामुळे यंदाच्या अधिवेशात आ. निलंगेकर पाटील यांनी पुन्हा प्रश्‍न उपस्थित केला असून त्यावर सभागृहात चर्चा होवून या निवडीची शक्यता व्यक्त आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या