Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्याफायझरची लस ९५ टक्के प्रभावी

फायझरची लस ९५ टक्के प्रभावी

वॉशिंग्टन । वृत्तसंस्था

फायझर कंपनीने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीच्या क्लिनिकल ट्रायल डाटाचे अंतिम विश्लेषण केले आहे. या विश्लेषणानुसार, ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा फायझरने केला आहे.

- Advertisement -

ही लस सर्व वयोगटातील लोकांचे संरक्षण करते. आतापर्यंत 44 हजार लोकांवर या लशीची चाचणी करण्यात आली, असे फायझर आणि त्यांची भागीदार कंपनी बायोनटेक एसईने म्हटले आहे. या रिझल्टमुळे सर्वसामान्यांना लवकरात लवकर लस उपलब्ध करुन देण्यासाठी, परवाना मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे.लस वापरास मंजुरी मिळाल्यास अमेरिकेत डिसेंबरमध्ये लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

लशीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी आणि दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांनी शरीरात करोनापासून बचाव करणार्‍या घटकांची निर्मिती झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. करोनावर इतक्या मोठया प्रमाणात परिणामकारक ठरणारी लस उपलब्ध होणार ही चांगली बाब आहे. पण या लशीचे स्टोअरेज करणे हे एक मोठे आव्हान आहे. फायझरने बनवलेली लस नव्या टेक्नोलॉजीने विकसित केली आहे. व्हायरस विरोधात रोगप्रतिकारक शक्तीला सक्रीय करण्यासाठी सिंथेटीक एमआरएनएचा वापर केला जातो.

मायनस 70 डिग्री सेल्सिअस अंटार्क्टिकात हिवाळ्यात जे तापमान असते, त्या तापमानात लस स्टोअर करावी लागणार आहे. फायझरच्या लशीबाबत हेच एक मोठे आव्हान आहे. ही लस मायनस 70 डिग्री तापमानात स्टोअर करणे हे भारतासारख्या विकसनशील देशासाठी एक मोठे आव्हान असेल, असे एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरीया म्हणाले होते.

फायझर प्रमाणे मॉडर्ना कंपनीची लसही 95 टक्के प्रभावी ठरल्याने आता करोना प्रतिबंधाच्या उपायांत एक पाऊल पुढे पडले आहे. फायझर-बायोएनटेक तसेच मॉडर्ना या दोन्ही कंपन्यांनी अत्यंत अभिनव जैवतंत्रज्ञानाचा वापर करून या लशी तयार केल्या आहेत. त्यात संदेशवाहक आरएनए रेणू (मेसेंजर आरएनए- रायबोन्युक्लिइक अ‍ॅसिड) वापरण्यात आला आहे.

वृद्ध, आरोग्य सेवकांना प्राधान्य

लसीला मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णालयात दाखल असलेले वृद्ध, आरोग्य कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिल महिन्यापर्यंत सर्व नागरिकांसाठी लस उपलबध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांत आणि दुसर्‍या डोसनंतर सात दिवसांमध्ये संबंधित व्यक्तिंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. तिसर्‍या टप्प्यातील चाचणीच्या पहिल्या भागात ही लस करोनाला अटकाव करण्यास प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या