Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशPFI चे टार्गेट होते मोदी, रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट; ED चा...

PFI चे टार्गेट होते मोदी, रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट; ED चा खळबळजनक दावा

दिल्ली | Delhi

सध्या केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आहेत. देशभरात दोन दिवसपूर्वी PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे.

- Advertisement -

PFI ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. असा खळबळजनक दावा केंद्रीय तपास यंत्रणा ईडीकडून करण्यात आला आहे. जुलै २०२२ मध्ये PFI ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील रॅलीला लक्ष्य करण्यात आले होते. तसेच उत्तरप्रदेशातील इतर संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याच्या कट रचला होता, असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

गुरुवारी केरळमधून PFI सदस्य शफीक पायथ या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ईडीने वरील दावा केला आहे. या दाव्यानुसार यावर्षी १२ जुलै रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील रॅलीला लक्ष्य करण्याचा PFI चा कट होता. याआधी इंडियन मुजाहिद्दीनसी संबंध असलेल्या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये मोदी यांच्या पाटणा येतील रॅलीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

यासोबतच मागील काही वर्षांपासून PFI तसेच PFI शी संबंध असलेल्या संस्थांच्या खात्यामध्ये १२० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही ईडीने म्हटले आहे. यातील काही रक्कम देशातील तसेच काही परदेशी संशयास्पद स्त्रोतांकडून रोख स्वरुपात जमा करण्यात आली होती. ही रक्कम देशात दहशतवादी कृत्ये तसेच दंगली घडवण्यासाठी वापरण्यात येत होती, असा दावा ईडीने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या