Friday, April 26, 2024
Homeनाशिकसातपूरमध्ये पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले; वाहनचालक चिंतीत

सातपूरमध्ये पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले; वाहनचालक चिंतीत

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

पेट्रोलचे दर शंभरी पार गेल्याने (Petrol price has crossed hundred rupees) पेट्रोल भरणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यातच गाडीतील पेट्रोल चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने वाहनचालक चिंतित झाले आहेत…

- Advertisement -

सातपूर कॉलनीच्या (Satpur Colony) कोपऱ्यावर असलेल्या श्रीराम हाईट्स (Shriram Heights) या म्हाडाच्या (Mhada) नवीन इमारतीतील पार्कीगमध्ये अनेक दुचाकी उभी असतात. या दुचाकींमधून (Two-wheeler) तीन बाटल्या पेट्रोल चोरण्याचा प्रकार घडला आहे.

बिल्डींगमधील एक युवक अचानक खाली उतरल्यानंतर चोरट्यांनी (Thieves) बाटल्या तेथेच टाकून पळ काढला. भर सकाळी घडलेल्या या घटनेमुळे रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.

वाढत्या पेट्रोल दरामुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. पूर्वी दुचाकीची टाकी फुल करणारे ग्राहक आता एक आणि दोन लिटर पेट्रोल घेत आहेत. त्यातूनही पेट्रोलची चोरी होत असल्याने वाहनचालक चिंता व्यक्त करीत आहेत.

पेट्रोल चोरीच्या वाढत्या घटना पाहता अनेक दुचाकीस्वारांनी पेट्रोल कॉकला कूलुप लावले आहे. असे असतानाही कॉक तोडून पेट्रोल चोरीचा (Theft) धाडसी प्रकार होतो. तसेच नळी कापून पेट्रोल चोरी केली जाते. मोपेड दुचाकींमधून पेट्रोल काढणे शक्य होत नाही म्हणून चोरटे या गाड्यांचे पार्ट चोरी करीत असल्याचे समोर आले आहे.

सातपूरसह शहरातील इतर भागातही पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) लावल्यास गुन्हेगारांना पकडणे सोपे होईल, असे सातपूर पोलीस ठाण्याचे वपोनि किशोर मोरे (Kishor More) यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या