Thursday, April 25, 2024
Homeनगरपेट्रोल पंपाला हार घालून दरवाढीचा निषेध

पेट्रोल पंपाला हार घालून दरवाढीचा निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)- पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत नगरमध्ये निदर्शने केली. पेट्रोलपंपाला चपलांचा हार घालत केंद्र सरकारचा निषेध केला. जीवनावश्यक वस्तूंवर लावलेले कर मागे घेऊन भाववाढ रोखावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आज सोमवारी आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष अभिजीत खोसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरवाढीच्या विरोधात सर्वसामान्य जनता होरपळून निघत असल्याचे सांगत आ. जगताप यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोलच्या मशीनला चपलांचा हार घालून आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध केला.

- Advertisement -

राष्ट्रादीच्या महिला अध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, विद्यार्थी अध्यक्ष गजानन भांडवलकर, वैभव ढाकणे, युती अध्यक्ष अंजली आव्हाड, साधना बोरुडे, नगरसेवक समद खान, अमोल गाडे, अजिंक्य बोरकर, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, आरिफ शेख, भिंगार युवक शहर संघटक मतीन सय्यद, गजेंद्र दांगट, विपुल वाखुरे, सैफअली शेख, विक्रांत दिघे, चेतन सपकाळ, किरण पंधाडे, अमित जाधव, सोमा तांबे, विशाल शिंदे, नितीन लिगडे, ऋषिकेश ताठे, रुपेश चोपडा, सुदर्शन ढवळे, आयाज सय्यद, अभिजीत खरपुडे, तनवीर मनियार, राजेश भालेराव, संभाजी पवार, रोहन शिरसाट, पंकज भंडारी आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या