Thursday, May 9, 2024
Homeदेश विदेशपेट्रोल-डिझेल मोडतंय कंबरडं; राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत... वाचा काय आहेत प्रमुख...

पेट्रोल-डिझेल मोडतंय कंबरडं; राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत… वाचा काय आहेत प्रमुख शहरांमधले दर

दिल्ली | Delhi

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे ४ नोव्हेंबरपासून देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती (Rates of petrol and diesel) स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. त्या दरम्यान कच्च्या तेलाचे दर वाढल्या नंतरही किंमतीत बदल केला नव्हता. त्याचा फटका आता पहायला मिळत आहे.

- Advertisement -

Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला ‘प्रार्थना’चा मोहक लूक, पहा फोटो

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (petrol disel rate today) आज पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात ३० पैशांनी आणि डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ झाली असून, त्यानंतर राजधानीत एक लिटर पेट्रोलचा दर ९९ रुपये ४१ पैसे आणि एक लिटर डिझेलचा दर ९० रुपये ७७ पैशांवर पोहोचला आहे. रविवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ५० पैसे आणि ५५ पैशांनी वाढ झाली होती.

अनिल अंबानींनी ‘या’ दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले… काय आहे कारण?

तर मुंबईत पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी महाग झालं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ११४ रुपये १८ पैसे इतके झाले आहेत, तर डिझेल ९८ रुपये ४६ पैसे प्रति लिटर झालं आहे. पुण्यात पेट्रोल ११३ रूपये ९० पैसे प्रति लिटर झालं आहे तर डिझेल ९६ रूपये ७६ पैसे प्रति लिटर झालं आहे. तसेच राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये झालं आहे, या शहरात पेट्रोलचा दर ११६ रूपये ८६ पैसे प्रति लिटर आहे तर डिझेल ९९ रुपये ४१ पैसे प्रति लिटर झालं आहे.

बॉक्स ऑफिसवर RRR चा दबदबा; The Kashmir Files ला जोरदार टक्कर

दरम्यान, रशियावरील सध्याच्या निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा कमी होईल आणि वाढीवर परिणाम होईल अशी भीती आहे. कच्च्या तेलाची किंमत मर्यादा भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण यामुळे पेट्रोल आणि डिझेल १५ ते २५ रुपयांनी महाग होऊ शकतात. सध्या भारत आपल्या गरजेपैकी ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात करतो.

Salman Khan : अभिनेता सलमान खानला अंधेरी न्यायालयाचे समन्स… काय आहे प्रकरण?

- Advertisment -

ताज्या बातम्या