Petrol-Diesel Price : महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’!

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ (Fuel Price Hike) होत होती.

गेल्या काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीला अखेर ब्रेक बसल्याचे दिसत आहे. गेल्या १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील दिलासादायक बाब मानली जात आहे.

देशाची राजधानी दिल्लीसह (Delhi) अनेक शहरात आजही दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) पेट्रोलचे दर प्रति लीटर १०७.८३ रुपये आहेत तर डिझेल ९७.४५ रुपये प्रति लीटरने विकले जात आहे मे महिन्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळते आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *