Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशपंधरा दिवसांनी पेट्रोल स्वस्त : जाणून घ्या आजचे दर

पंधरा दिवसांनी पेट्रोल स्वस्त : जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली

पंधरा दिवसांनी गुरुवारी इंधन दरात किरकोळ कपात केली. पेट्रोल दरात १६ पैशांची तर डिझेल दरात १४ पैशांची कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या दरात पाच टक्क्यांपेक्षा जास्तची तेजी आलेली असताना इंधन दरात कपात करण्यात आली आहे.

- Advertisement -

ब्रेंट क्रूड तेलाचे दर आता ६६.६२ डॉलर्सवर गेले आहेत. दुसरीकडे डब्लूपीआय क्रूड तेलाचे दर ६३.०३ डॉलर्सवर गेले आहेत. यापुर्वी क्रूड ऑईल ६३ डॉलर्स प्रती बॅरल होते. त्यात वाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले.

याआधी फेब्रुवारी महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली होती. फेब्रुवारी महिन्यात तेल कंपन्यांनी तब्बल १६ वेळा इंधन दरात वाढ केली होती. त्यावेळी पेट्रोल दरात झालेली वाढ ४.७४ रुपयांची होती तर डिझेल दरातील वाढ ४.५२ रुपयांची होती. या दरवाढीनंतर गेल्या काही दिवसात इंधन दरात तीनवेळा कपात झाली आहे.

नाशिक

पेट्रोल : ९७.१५

डिझेल : ८६.७९

नगर

पेट्रोल : ९७.०८

डिझेल : ८६.७३

जळगाव

पेट्रोल : ९७.86

डिझेल : ८७.४७

- Advertisment -

ताज्या बातम्या