Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

दिल्ली । Delhi

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे. (petrol diesel price today centre reduces excise duty on fuel)

सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरील (petrol diesel price) उत्पादन शुल्कात (excise duty) अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घाेषणा केली. यामुळे देशभरात पेट्रोल ९.५० रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल १०५.४१ रुपयांवरुन ९५.९१ रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल ९६.६७ रुपयांवरुन ८९.६७ रुपयांवर पोहोचलं आहे.

तर मुंबईत पेट्रोलचे दर १२०.५१ रुपयांवरून १११.०१ रुपये प्रति लिटर झाले आहेत. तसेच, डिझेलची किंमत १०४.७७ रुपयांवरून ९७.७७ रुपये प्रति लिटर होणार आहे.

तसेच कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत अशी तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *