पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या, काय आहेत दर?

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

करोनामुळे नागरिक संकटात असताना दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एका दिवसाच्या ब्रेकनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

काल पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर पाहायला मिळाले. पेट्रोल प्रतिलीटर 24 पैशांनी तर डिझेल प्रति लीटर प्रति लीटर २७ पैशांची महागलं आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा दरही ९० रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर ९२.५८ रुपये आणि डिझेल प्रतिलीटर ८३.२२ रुपये झालं आहे. मुंबईत पेट्रोल ९८.८८ प्रतिलीटर रुपये आणि डिझेल ९०.४० रुपये प्रतिलीटर झालं आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ९२.६७ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल प्रति लीटर ८६.०६ रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल प्रति लीटर ९४.३४ रुपये तर डिझेल प्रति लीटर ८८.०७ रुपये झालं आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये १०३.५२, मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळ, रीवा, अनूपपूर आणि महाराष्ट्रातील परभणी येथे पेट्रोल १०० पार केले आहे.

दरम्यान मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ९ वेळा वाढल्या आहेत. देशभरातील विविध राज्यात लॉकडाउन, नाईट कर्फ्यू किंवा तत्सम निर्बंधांमुळे इंधनाची मागणी कमी झाली आहे. गेल्या १८ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्यानंतर ४ मे नंतर पुन्हा दरवाढ सुरु आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर १० दिवसांत पेट्रोल २.२१ पैसे आणि डिझेल २.४९ रुपयांनी महागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *