Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकइंधन दरवाढीचा फटका; हमालीची जबाबदारी कुणाची?

इंधन दरवाढीचा फटका; हमालीची जबाबदारी कुणाची?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पेट्रोल-डिझेलची झालेली प्रचंड दरवाढ (Petrol-Diesel Price Hike), भाडेवाढीचा न झालेला निर्णय यासह अनेक प्रश्नांमुळे वाहतूकदार (Transporter) अडचणीत असताना हमालीचा बोजादेखील वाहतूकदारांना सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मालवाहतूक करतांना लागणाऱ्या हमालीची पूर्ण जबाबदारी संबंधित मालकावर राहणार असल्याचा निर्णय नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशने (Nashik District Transport Association) घेतला आहे….

- Advertisement -

याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड (Rajendra Phad), कार्याध्यक्ष पी. एम. सैनी (P. M. Saini) यांनी आयमा, निमा, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Nashik District Collector Suraj Mandhare) यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, देशातील दळणवळणात वाहतूकदारांचा प्रामुख्याने मोठा सहभाग आहे. यात वाहतूक करण्यासोबत असंख्य अडचणी आहे. यात हमाली व वाराई वाहतूकदारांनाच करावी लागते.

माल वाहतूक करणे ही प्रमुख जबाबदारी असून त्यात एका जागेहून दुसऱ्या जागेवर माल नेताना विविध गाव, जिल्हे, राज्य अशी वाहतूक करावी लागते. त्यात हमाली व वाराईसाठी वाहन चालकास सक्ती करण्यात येते. बाहेर गावाहून आलेला वाहनचालकाला सर्व व्यवस्था करणे शक्य होत नसल्याने त्याची खुप लूट होत आहे.

ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मालवाहतूक करताना गाडी भरण्यासाठी लागणारी हमाली, वाराई माल उतरविण्यासाठी लागणारी हमाली, वाराई याचा भार गाडी मालक व ट्रान्सपोर्ट चालकांना सहन करावा लागतो. याचे सर्व खर्च अकाऊंटमध्ये आल्याने त्याचे व्यवहार वाढतात. यामुळे विनाकारण तोटा सहन करावा लागतो.

मालवाहतूक करताना अनधिकृत हमाली घेतली जाते. त्यामुळे वाहतुकदारांना माल वाहतूक करताना नाहकच आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच कांदा, द्राक्ष व्यापारी व कंपनी मालकांची मनमानी कारभारालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहतूकदार अनेक अडचणींचा सामना करत आहे.

वास्तविक वाहतूक करताना माल भरण्याची आणि उतरविण्याची जबाबदारी ही पूर्णपणे त्या मालाच्या मालकाची असते. मात्र त्याचा भुर्दंड गाडी मालक व ट्रान्सपोर्टर यांना सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतूकदार संघटनेच्या वतीने याबाबत माल भरणे व उतरविण्याची पूर्ण जबाबदारी ही मालाच्या मालकाची असणार असल्याबत निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूकदार यापुढे गाडीत माल भरणे तसेच उतरविणे याचे कुठलेही पैसे भरणार नाही याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या