Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशपेट्रोल पंप चालकांचे आज आंदोलन; काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव?

पेट्रोल पंप चालकांचे आज आंदोलन; काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव?

दिल्ली | Delhi

ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) आज केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार आहे. यासाठी पेट्रोल पंप डीलर्स मंगळवारी पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाही आहेत. असे असले तरी पेट्रोल पंपावर (Petrol pump) पेट्रोल आणि डिझेलची विक्री होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशीही देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नसून दर स्थिर आहेत. सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहेत.

मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १११.३५ रुपये तर डिझेलचा भाव ९७.२८ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये तर डिझेलचा भाव ८९.६२ रुपये इतका आहे. पुण्यात एक लीटर पेट्रोलचा भाव १११.९३ रुपये तर डिझेलचा भाव ९६.३८ रुपये प्रति लिटर आहे.

नाशिकमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १११.२५ रुपये तर डिझेलचा भाव ९५.७३ रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा भाव १११.४१ रुपये तर डिझेलचा भाव ९५.९२ रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा भाव १११.०२ रुपये तर डिझेलचा भाव ९५.५४ रुपये प्रति लिटर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या