Friday, April 26, 2024
Homeनगरपेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याची जनतेची मागणी

पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याची जनतेची मागणी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पेट्रोल व डिझेलच्या दरात होत असलेली वाढ ही महागाई वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. ग्रामीण सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन महागाईचा मोठा फटाका बसत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरी करणार्‍या कुटुंबांचे आर्थिक हाल होत आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलचे वाढलेले दर कमी करावेत, अशी मागणी ग्रामीण भागात जोर धरत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात झालेली दरवाढीवर केंद्र व राज्य सरकारने एकत्रीत निर्णय घेतला पाहिजे.

- Advertisement -

परंतु तसे न होता सध्या राजकीय धुराळा उडवून जनतेच्या मूळ प्रश्नावर बगल देण्याचा हा प्रकार आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारला जनतेच्या प्रश्नाचा विसर पडला आहे का ? अशी चर्चा शेतकरी, शेतमजूर यांच्यात आहे. पेट्रोल, डिझेलच्या प्रंचड प्रमाणात झालेली दरवाढ ही सर्व प्रकारच्या किराणा, औषधे, शेती बियाणे, रासायनिक खते, कपडे, भाजीपाला, सुका मेवा मसाल्याचे पदार्थ मालाची वाहतूक करणे या सह सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

यात सर्वसामान्य माणसे होरपळत आहे. केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे पेट्रोल व डिझेलचे वाढलेले दर कमी करण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागाणी सुभाष वाकचौरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या