पेठ तालुका कृषी घोटाळा : पंधरा पैकी ‘इतक्या’ कृषी अधिकाऱ्यांना जामीन

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nashik

पेठ (Peth) तालुक्यातील कृषी विभागातील (Peth Taluka agriculture dept) ५० कोटी ७२ लाख रुपयांच्या भ्रष्टाचार (Corruption) प्रकरणी १५ कृषी अधिकार्‍यांपैकी १२ जणांना न्यायालयाने अटकपुर्व जामीन (bail before arrest approved) मंंजुर केला आहे….

याबाबत अधिक माहीती अशी की, गेल्या पाच जानेवारीस पेठ पोलिस ठाण्यात (Peth Police Station) पेठ न्यायालयाच्या आदेशावरुन ५० कोटी ७२ लाख रुपयांंच्या भ्रष्ट्राचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तीन कृषी अधिकारी (Agriculture Officer) किरण कडलग, अशोक घरटे व मुकेश महाजन यांना १३ जानेवारला न्यायाधीश ए.ऐस देशमुख यांनी जामीनावर मुक्त केले.

इतर बारा अधिकारी अटक पुर्व जामीनासाठी न्यायालयीन लढा देत होते. त्यात नरेश पवार, दगडु पाटील, संजय पाटील, विठ्ठल रंधे, दीपक कुसळकर, दिलीप फुलपगार, मुकुंंद चौधरी, प्रतीभा माघाडे, राधा सहारे, विश्‍वनाथ पाटील, सरदारसिंंग राजुपत, शिलानाथ पवार यांंचा समावेश होता.

त्यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.ए. शिंदे यांच्या समोर सुनावणी झाली. न्यायालयाने अटकपुर्व जामीन मंंजुर केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *