कार्यसंस्कृतीच्या पैलुंमुळे व्यक्तिमत्व विकास

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आत्मविश्वास, क्षमता, (Confidence, ability) प्रामाणिकता, कल्पकता, संवाद, मूल्य, निष्टा, शिस्त, तणाव व्यवस्थापन, वेळेचे नियोजन (Time planning)अशा कार्यसंस्कृतीच्या पैलुंमुळे व्यक्तिमत्व विकास (Personality development) करणे शक्य आहे. असे मत, गोखलेज अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्युटचे संचालक (Director, Gokhalej Advanced Training Institute) देवदत्त गोखले (Devdutt Gokhale) यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्राचे वैभव असलेल्या दहा किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडत कार्य संस्कृतीची मांडणी केली.

दैनिक ‘देशदूत’च्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात सहकार्‍यांशी त्यांनी ‘दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती’या विषयावर दीड तास दिलखुलास संवाद साधला. प्रारंभी दैनिक ‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने यांनी देवदत्त गोखले यांचे स्वागत केले. आपल्या कामात अधिक सकारात्मकता आणि कार्यक्षमता वाढवायची असल्यास किल्ल्यांचे वैशिष्ट समजून घेणे आवश्यक असून, रायगड, राजगड, तोरणा, सिंहगड, शिवनेरी, सिंधूदुर्ग, पुरंदर-वज्रगड, प्रतापगड, सज्जनगड, आणि पन्हाळा या किल्ल्यांचा आपल्या कार्यसंस्कृतीचा किती जवळचा संबंध आहे याची उत्तम पध्दतीने विविध पैलूंवर आधारित वैशिष्ट्ये त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दूर्ग संस्कृती आणि व्यक्तिमत्वाची सांगड

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड, किल्ल्यांच्या माध्यमातून देवदत्त गोखले यांनी कार्य संस्कृतीवर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी दुर्ग संस्कृती आणि व्यक्तिमत्व विकासाची सांगड घातली. शिवनेरी किल्ल्याच्या माध्यमातून संस्कारावर आधारीत असलेला दृष्टीकोन आणि स्वत्वाचा विचार प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्व विकास घडविते. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला सिंधुदूर्ग किल्ला समुद्रात उभा रहिला आहे. यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा शाश्वत विचार आणि दुरदृष्टी दिसून येते. स्वतःतील क्षमता ओळखून काम केल्यास, कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करता येते. अर्थात तोरणा किल्ल्यातून क्षमतेची खात्री झाली, पुरंदर किल्ल्याला स्वराज्यात महत्वाचे स्थान देण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका प्रजाहित आणि दक्ष राजा असल्याचे दर्शन घडते, पुरंदर-वज्रगड हे जोड किल्ले आत्मविश्वासाचे प्रतिक आहे.

जसा राजगडाचा पाया भक्कम होता, त्याप्रमाणे आपल्या प्रत्येक कामाचा पाया भक्कम असला पाहिजे. जसा स्वराज्याचा डोलारा उभा राहिला. तशीच आपल्या आयुष्यालाही दिशा देणारी कार्यपध्दती असावी ही शिकवण किल्ले राजगडातून मिळते. अनेक माणसे जेव्हा एकत्र येवून काम करतात, तेव्हा त्यांच्यात संवाद होणे महत्वाचे असते. किल्ले रायगड हे संवाद कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या कामाशी एकनिष्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते पण ते मन लावून निष्टेने केले तर, त्या कामाला एक वेगळे महत्व प्राप्त होते.

हीच कामावरील निष्ठा व बांधिलकी किल्ले सिंहगडाकडून शिकायला मिळते. आपल्या कामात कल्पकता असायला हवी. आणि ही कल्पकता पन्हाळा किल्ल्यावरुन दिसून येते. सज्जनगडाचे वातावरण अध्यात्मिक लहरींनी भारलेले आहे. म्हणूनच सज्जनगड हे सकारात्मक उर्जेचे स्त्रोत आहेत. प्रत्येकाच्या कार्यशैलीत मानसशास्त्राचा उपयोग महत्वाचा आहे. माणसिकता ओळखून त्या पध्दतीने काम करुन घेणे ही कला महाराजांना अवगत होती. म्हणूनच प्रतापगड वेळेच्या सुयोग्य नियोजनाचे मूर्तीमंत प्रतीक असल्याचे पैलू देवदत्त गोखले यांनी उलगडले. सुत्रसंचालन मुख्य उपसंपादक डॉ.गोपी सोरडे यांनी केले. यावेळी ‘देशदूत’चे सर्व सहकारी उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *