Friday, April 26, 2024
Homeनाशिकनगररचना नाशिककरांना वेठीस धरते

नगररचना नाशिककरांना वेठीस धरते

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सुमारे 75 हजार कुटुंब नाशिकच्या (nashik) नदीतरी राहतात. त्याप्रमाणे रेड (red) व बल्यू लाइनप्रमाणे बांधकाम परवाने (Building permits) देण्याचे कायदे असून सुद्धा आनंदवली (Anandavali) शिवारातील काही बिल्डरांना थेट नदी पात्रात (River character) इमारती बांधकामसाठी (Construction of buildings) परवानगी कशी देण्यात आली,

- Advertisement -

असा प्रश्न उपस्थित करून नगररचना विभागात (Town Planning Department) नाशिककरांना वेठीस धरत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख (Corporator Salim Sheikh) यांनी केला. त्याचप्रमाणे संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली, अन्यथा सभागृहात आंदोलन (agitation) करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

आज (दि.6) नाशिक महापालिकेची (Nashik Municipal Corporation) स्थायी समितीची सभा सभापती गणेश गीते (Standing Committee Chairman Ganesh Gite) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक शेख यांनी नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. तर शिवसेना (shiv sena) नगरसेवक सुधाकर बडगुजर (sudhakar badgujar) यांनी देखील पाठिंबा देत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावर सभापती गीते यांनी पुढच्या सभेत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले.

नगरसेवक शेख यांनी गोदावरीचा (godavari) प्रश्न उपस्थित करत नगररचना विभागातील अधिकार्यांना धारेवर धरले. याप्रकरणी नगररचना विभागाच्या अधिकार्यांना जाब विचारला असता, अधिकार्यांनी मोजणी करुन सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगून वेळ मारुन नेली. यावर नगरसेवक शेख यांनी नगररचना विभाग डोळे झाकून आहेत का, गोदावरी पात्राला लागूनच बिल्डर त्यांची बांधकामे उभी करत आहे. नाशिककरांना वेठीस धरुन बिल्डरांना नदी पात्रेशेजारी बांधकामाची परवानगी कशी काय दिली जाउ शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी आनंदवली शिवारातील सर्वे क्रमांक 65 मध्ये सुरू असलेल्या कामाचे फोटो देखील असल्याचे सांगत या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी सभापती गणेश गीते यांच्याकडे केली. गोदावरी पात्रेबरोबरच शहरातील जे नैसर्गिक नाले आहेत. ते सुध्दा नाले अरुंद केले जात आहे. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र नदी, नाले अरुंद करुन ते बुजवून कामे होत असेल तर हे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे भविष्यात नाशिक जलमय झाले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.

शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनीही नदी पात्रापासून किती अंतरावर बांधकाम केले जाउ शकते याची माहिती अधिकार्यांकडे मागितली. जुन्या नाशकात दोन्ही बाजूने हजारो नागरिक राहतात. त्यांचे काय असा सवाल बडगुजर यांनी केला. तर भाजप (bjp) नगरसेवक मुकेश शहाणे (Corporator Mukesh Shahane) यांनी आपल्या भागात पाण्याच्या टाकीचे काम का होत नाही वारंवार फोन करुनही अधिकारी दूर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी करत विभागातील अधिकारी ठेकेदाराला का पाठीशी घालत आहे. विद्युत पोल केवळ लावून ठेवले आहेत.

त्यांची फिटींग कधी होइल. नागरिक आम्हाला प्रश्न विचारतात. त्यांना आम्ही काय सांगायचे हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी सभापतींकडे केली. कॉग्रेस नगरसेवक राहुलदिवे यांनी टाकळीकडून औरंगाबाद महामार्गाकडे (Aurangabad Highway) जाणार्या पालिकेच्या रस्त्यावरील खड्यांचा प्रश्न उपस्थित करत अनेक दिवसांपासून या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असून तात्काळ बुजविण्याची मागणी केली. यावेळी सभापती गणेश गीते यांनी सर्व विकासाच्या कामांना मंजूरी दिली.

सामान्य नागरिकांना ब्लू व रेड या नियमांप्रमाणे बांधकामांना परवानगी नाकारली जाते. मात्र मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना कशी परवानगी दिली जाते. शहरातील गोदावरी नदी व इतर नाले आहेत ते अरुंद करण्याचे काम बिल्डर लॉबी व नगररचना विभाग करत आहे. संपूर्ण चुकीची कामे बंद करण्यात यावी, दोषींना शासन व्हावे, अन्यथा आंदोलन उभे करण्यात येईल.

– सलीम शेख, नगरसेवक, मनसेना

- Advertisment -

ताज्या बातम्या