Friday, April 26, 2024
Homeनगरकेडगावात परमीट रूम फोडले

केडगावात परमीट रूम फोडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तीन चोरट्यांनी हॉटेलच्या दरवाजाचे लॉक (Lock) तोडून, खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. हॉटेलमधील 11 हजार रूपयांची दारू (Alcohol), सात हजार रूपये रोख रक्कम असा सुमारे 21 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. नेप्ती (Nepti) रस्त्यावरील पाटील कॉलनीतील हॉटेल विश्वलक्ष्मी परमीट रूम व बियरबारमध्ये (Permit Room and Beer Bar) ही घटना घडली.

- Advertisement -

या प्रकरणी हॉटेलचे मालक मच्छिंद्र विश्वनाथ पठारे (वय 43 रा. पठारे कॉलनी, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता पठारे यांनी हॉटेल बंद केले. शनिवारी सकाळी आठ वाजता त्यांना हॉटेलमधील कामगाराने हॉटेलचे लॉक तुटले व खिडकीचे गज कापले असल्याचे सांगितले.

पठारे यांनी पाहणी केली असता हॉटेलमध्ये उचकापाचक झालेली दिसून आली. रोख रक्कम, दारू चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार गाजरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या