Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्याबाहेर जाण्यासाठी 3 हजार जणांना परवानगी

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी 3 हजार जणांना परवानगी

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच इतर जिल्ह्यातून नाशिक मध्ये येण्यासाठी ई पास द्वारे परवानगी बंधनकारक करण्यात आली असून 23 एप्रिल ते आतापर्यंत या आठ दिवसाच्या कालावधीत 11 हजार 336 अर्ज पोलीस प्रशासनास प्राप्त झाले आहेत. यातील 2 हजार 810 अर्जांना परवानगी देण्यात आली असून इतर नाकारण्यात आले आहेेत तर काही प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातसुध्दाही कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने ङ्गब्रेक द चेनफअंतर्गत विविधप्रकारचे कडक निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याकरिता शहर तसेच ग्रामिण पोलीसांनी कंबर कसली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. तपासणी नाक्यांवर फिक्स पॉइंट सक्रीय करण्यात आले आहे. आठ तपासणी नाक्यांवर पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड असा एकुण सुमारे 200 पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नागरिकांना आंतरराज्य सीमा ओलांडून दुसर्‍या जिल्ह्यात अत्यावश्यक गरजेच्या कारणांनी प्रवास करावयाचा असल्यास त्यांच्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ङ्गई-पासफची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी गरजु नागरिकांनी संकेतस्थळाचा वापर करत ऑनाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज ज्या जिल्ह्यातून प्रवास कारायचा आहे त्या आयुक्त तसेच अधिक्षकांना प्राप्त होतो. त्यांनी परवानगी दिल्यास ऑनलाईन पास प्राप्त होऊन प्रवास करता येतो. ङ्गई-पासफ प्राप्त झाल्यानंतरसुध्दा प्रवासाकरिता असलेली वाहने आणि त्यानुसार शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम, अटींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास कारवाई केली जात आहे.

ग्रामिण भागातील अर्जांना अधिक्षक पाटील परवानगी देत आहेत. तर नाशिक शहरातील अर्ज असतील तर गुन्हे शाखा, परिमंडळ 1 व परिमंडळ दोनचे उपायुक्त ई पासला परवानगी देत आहेत. ई पास सुरू झाल्यापासून जिल्ह्याच्या ग्रामिण भागातून 1 हजार 219 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर पैकी केवळ 153 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर 1 हजार 66 नामंजुर करण्यात आले आहेत. नाशिक शहरात 10 हजार 117 अर्ज प्राप्त असून पैकी 2 हजार 657 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. 5 हजार 666 नामंजुर करण्यात आले आहेत. तर 335 अद्याप प्रलंंबित आहेत.

ई पाससाठी अर्ज प्रक्रिया

https://covid19.mhpolice.in/ या संकेत स्थळावर जा

‘अ‍ॅप्लाय फॉर पास हिअर’ यावर क्लिक करा

अर्ज ओपन झाल्यानंतर आवश्यक सर्व माहिती भरा

ज्या मध्ये आयुक्तालय, जिल्हा

नाव, पत्ता, किती तारखेदरम्यान प्रवास करायचा आहे

मोबाईल नंबर, प्रवासाचे कारण, उद्देश

वाहनाचा प्रकार, प्रवास प्रारंभाचे ठिकाण, अंमित ठिकाण

सहप्रवाशी संख्या, त्यांची नावे, माहिती

कंटेन्ट झोनमधील आहोत का, प्रवासाचा मार्ग

आपला फोटो, ओळखपत्राचा फोटो,

प्रवासास सबळ कारण असणारी कागदपत्रे उदा. उपचारासाठीच्या रूग्णाचे कागदपत्र, कोरोना टेस्ट रिपोर्ट

आदी परिपुर्ण माहिती भरून अर्ज सबमिट करा

आपणास टोकण क्रमांक प्राप्त होईल.

टोकनवरून आपणास अर्जाचा प्रवास समजू शकेल.

मंजुरी मिळाल्याच्या मॅसेच प्राप्त होताच टोकन नंबर टाकल्यास

पीडीएफ स्वरूपातील अर्ज प्राप्त होईल

- Advertisment -

ताज्या बातम्या