Sunday, May 5, 2024
Homeनाशिकशिवजन्मोत्सवास हिरवा कंदिल : भुजबळ

शिवजन्मोत्सवास हिरवा कंदिल : भुजबळ

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यात प्रशासनाच्या प्रयत्नांतून कोरोनावर यशस्वी नियंत्रण मिळविता आले आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात बर्‍याच प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून शहर व जिल्ह्यात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात करावा अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिल्या.

- Advertisement -

पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक येथील संपर्क कार्यालयात शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते. यावेळी छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती,नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समिती, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण, भाई समाज मित्र मंडळ, शिवसाई फ्रेंड सर्कल, लष्कर ए शिवबा, अशोकस्तंभ साईबाबा मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, शिवसेना प्रणित अर्जुन क्रीडा मंडळ, आत्मविश्वास व्यायाम शाळा, गर्जना युवा प्रतिष्ठान, हिंदूसम्राट मित्र मंडळ, धर्मवीर ग्रुप सिडको, मराठा मित्र मंडळ सातपूर, शिवमुद्रा प्रतिष्ठान, शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोड, शिवजन्मोत्सव समिती सातपूर, अखंड शिवजन्मोत्सव समिती, पाथर्डीगाव शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहरातील पारंपारिक मिरवणुका व कार्यक्रमांना परवानगी देण्यास प्राधान्य देण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवीन मंडळांना परवानगी मिळणार नाही. शासनाने दिलेल्या नियमावली नुसार शिवजन्मोत्सवास परवानगी देण्यात येईल. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करणे सर्व मंडळांना बंधनकारक असणार आहे.

मिरवणुका काढतांना त्या वेळेत काढण्यात याव्यात आणि वेळेत संपविण्यात याव्यात. यामध्ये जास्त गर्दी होणार नाही यासाठी काळजी सर्व मंडळांनी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित मंडळाच्या पदाधिकार्‍यांना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या