Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाBCCI ला ड्रोन वापरण्यास परवानगी

BCCI ला ड्रोन वापरण्यास परवानगी

दिल्ली l Delhi

नागरी उड्डाण मंत्रालय (MoCA) आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे महासंचालक (DGCA) यांनी

- Advertisement -

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) सन २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट हंगामाच्या थेट हवाई छायाचित्रणासाठी ड्रोन तैनात करायला सशर्त परवानगी दिली आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाला बीसीसीआय व मेसर्स क्विडिक कडून थेट हवाई छायाचित्रणासाठी रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टीम (RPAS) वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात विनंती झाली होती.

नागरी उड्डाण मंत्रालयाचे सहसचिव अंबर दुबे म्हणाले, “ड्रोन संकल्पना आपल्या देशात वेगाने विकसित होत आहे. याचा उपयोग कृषी, खाणकाम, आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन ते क्रीडा व करमणुकीपर्यंत विस्तारत आहे. देशातील ड्रोनच्या व्यावसायिक वापराला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या उद्देशाच्या अनुषंगाने ही परवानगी देण्यात आली आहे. ड्रोन नियम २०२१ हे कायदा मंत्रालयाशी चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहेत. आम्ही मार्च २०२१ पर्यंत ते मंजूर होण्याची अपेक्षा करीत आहोत, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या