Thursday, April 25, 2024
Homeनगरग्रामसभांना परवानगी

ग्रामसभांना परवानगी

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्य शासनाने कोविडचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केलेले आहेत. त्या अनुसार राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी जयंतीच्या दिनी होणाऱ्या ग्रामसभा ऑफलाईन घेण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. शाळाही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचाही हा संकेत मानला जात आहे.

- Advertisement -

ग्रामसभा सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान आयोजित करण्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या ग्रामसभेत जल जीवन मिशनबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ग्रामविकास विभागाचे अवर सचिव सुहास जाधवर यांनी जारी केलेल्या पत्रान्वये ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेता येतील हे यातून स्पष्ट झाले आहे. अर्थात ऑफलाईन ग्रामसभा घेताना प्रत्येक ग्रामपंचायतीने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगसह सॅनेटायझरचा वापर या या सह इतरही मार्गदर्शक सूचनांचे पालन काटेकोरपणे करण्याच्याही सूचना यात देण्यात आल्या आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या दृष्टीने ग्रामसभांना विशेष महत्व असते. त्यातही गांधी जयंतीच्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभेला अधिकचे महत्त्व असते, त्या मुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर आता प्रत्यक्षपणे ग्रामसभा होणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर त्याचे स्वागतच होईल. अनेक महत्वाचे निर्णय या दिवशी घेतले जातात, अनेक वर्ष प्रत्यक्षपणे सभेचा अनुभव असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन मिटींग अवघडच जात होती, त्या मुळे आता समोरासमोर बसून होणाऱ्या ग्रामसभेच्या निमित्ताने गावोगावी उत्साहाचे वातावरण असेल अशी चिन्हे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या