Saturday, April 27, 2024
Homeनगरहुश्श...बाधितांची टक्केवारी घटली

हुश्श…बाधितांची टक्केवारी घटली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात मे महिन्यांच्या पहिल्या सात दिवसांत केलेल्या करोना चाचणीत बाधित आढळून येणार्‍यांची टक्केवारी 43.57 टक्के होती. मात्र, कडक लॉकडाऊनचा परिणाम म्हणून जिल्ह्यात 22 पासून बाधित येणार्‍यांचे प्रमाण 10. 47 टक्क्यांपर्यंत खाली आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आरोग्य विभागाने 1 ते 7 मे दरम्यान 61 हजार 585 रुग्णांची करोना चाचणी केली होती. यात 26 हजार 816 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. हे प्रमाण टक्केवारीत 43.57 टक्के होते. त्यानंतर 7 ते 14 मे दरम्यान 79 हजार 967 संशयितांची करोना चाचणी केल्यानंतर त्यात 22 हजार 816 करोना बाधित आढळून आले. त्यावेळी सरासरी टक्केवारी ही 28.53 टक्के होती.

त्यानंतर तिसर्‍या आठवड्यात 15 ते 21 मे दरम्यान 1 लाख 19 हजार 935 जणांची करोना चाचणी करण्यात आली. यात 17 हजार 892 करोना बाधित समोर आले. त्याची टक्केवारी 14.92 टक्के होती आणि आता 22 मे रोजी 17 हजार 673 जणांची करोना चाचणी करण्यात आली. यात 1 हजार 851 करोना बाधित आढळून आले असून त्यांची टक्केवारी 10.47 टक्के आली आहे.

जिल्ह्यात मे महिन्यांत 22 तारखेअखेर 2 लाख 79 हजार 160 जणांची करोना चाचणी करण्यात आली. यात 68 हजार 389 करोना रुग्ण आढळून आले असून त्यांची सरासरी टक्केवारी ही 24.86 टक्के असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या