Friday, April 26, 2024
HomeUncategorizedदिव्यांगांना घरबसल्या लस मिळावी 

दिव्यांगांना घरबसल्या लस मिळावी 

औरंगाबाद – Aurangabad

दिव्यांगांना घरीच कोरोनाची लस देऊन त्यांच्या अडचणी कमी करण्याची विनंती हायकोर्टात जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकाकर्ते स्वतः दिव्यांग आहेत. याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. आर. व्ही. घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

- Advertisement -

लातूर येथील सचिन चव्हाण यांनी सदर याचिका दाखल केली आहे. दिव्यांग व्यक्तींना कोरोनाप्रतिबंधक लस मिळावी. दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ नुसार त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीत दिव्यांगांच्या हक्काचे संरक्षण करणे आणि त्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी असते, असे याचिकाकर्त्याच्या वतीने कोर्टासमोर मांडण्यात आले आहे.

याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. आर. व्ही. घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य आणि केंद्र सरकारला खंडपीठाने नोटीस बजावली आणि दिव्यांग व्यक्तींसाठी कोरोनाच्या लशीबाबत तातडीने काय पावले उचलता येतील व त्यांना कशा पद्धतीने आर्थिक मदत करता येईल? याचा खुलासा करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात राज्य सरकारला एका आठवड्यात उत्तर दाखल करावे लागणार आहे. अॅड. डॉ. स्वप्नील तावशिकर यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या