Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकआणीबाणीच्या लढ्यातील ७८ जणांची पेंशन बंद

आणीबाणीच्या लढ्यातील ७८ जणांची पेंशन बंद

नाशिक । Nashik

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींसाठी मागील भाजप सरकारने सुरु केलेली मानधन योजना सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने बंद केली आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचे कारण हे कारण देण्यात आले. नाशिक जिल्ह्यात ७८ तुरुंगवास भोगलेल्यांना ही पेंशन सुरु होती. पण नव्या निर्णयामुळे त्यांची पेंशन बंद झाली असल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही योजना सुरू केली होती. जानेवारी २०१८ पासून त्याचा लाभ देण्यात आला. १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत तत्कालीन सरकारविरुद्ध लोकशाहीसाठी लढा देताना तुरुंगवास भोगलेल्यांसाठी ही योजना होती.

एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मसिक दहा हजार व त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस पाच हजार. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार व त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस रुपये अडीच हजार रुपये मानधन सुरू करण्यात आले होते. राज्यातील ३हजार २६७ जणांना याचा लाभ मिळाला होता. यासाठी २९ कोटी रुपयांचे वितरणही झाले होते.

राज्यात सुमारे १२०० प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. आणीबाणीतील योध्दांचा सन्मान करण्यासाठी मागील सरकारने ही योजना सुरू केली होती. जिल्ह्यात ७८ जणांना या पेंशनचा लाभ मिळत होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेला विरोध सुरू झाल्याने पेंशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या