Thursday, April 25, 2024
Homeनगरपेन्शनप्रश्नी लक्ष घालणार; खा. विखे यांचे शिष्टमंडळास आश्वासन

पेन्शनप्रश्नी लक्ष घालणार; खा. विखे यांचे शिष्टमंडळास आश्वासन

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

इपीएस 95 पेन्शनर्स राष्ट्रीय संघर्ष समितीचे शिष्टमंडळाने खा. डॉ. सुजय विखे पा. यांची लोणी येथे भेट घेऊन प्रलंबित पेन्शनवाढ प्रश्नी सविस्तर चर्चा केल्यावर

- Advertisement -

या प्रश्नी लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे व निश्चित न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले. अत्यंत तुटपुंजी मिळणारी पेन्शन व इपीएफओ करीत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला.व त्यांना निवेदन देण्यात आले.आजपर्यंत केलेल्या विविध आंदोलनाची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समक्ष भेटून आमच्या व्यथा मांडण्याविषयी विनंती केली. महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली सुकदेव आहेर, अशोक देशमुख, दत्तात्रय थोरात, रायभान तुपे, साहेबराव आहेर, दौलत वर्पे, रामनाथ खतोडे आदी पेन्शनर्स शिष्टमंडळ खा. विखे पा. यांना भेटले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या