Friday, April 26, 2024
Homeनाशिकप्रलंबित अर्ज, तक्रारींचा होणार निपटारा

प्रलंबित अर्ज, तक्रारींचा होणार निपटारा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिक विभागात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game)यांनी दिली.

- Advertisement -

सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा कालमर्यादेत निपटारा व्हावा, यासाठी सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर 10 सप्टेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे.

मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, नगर विकास, आरोग्य, पाणीपुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या