Tuesday, April 23, 2024
Homeजळगावमराठीतून नामफलक नसल्याने 35 दुकानांवर दंडात्मक कारवाई

मराठीतून नामफलक नसल्याने 35 दुकानांवर दंडात्मक कारवाई

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दुकाने व आस्थापनांवरील (shops and establishments) नामफलक मराठी भाषेतून (Nameplate from Marathi language) न लावलेल्या जळगाव जिल्ह्यातील 35 दुकाने आस्थापनांवर (shops establishments) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय (Office of the Assistant Labor Commissioner) जळगावकडून कारवाई (action) करण्यात आली आहे. ही कारवाई महाराष्ट्र दुकान व आस्थापना अधिनियम 2017 नुसार ही फौजदारी कारवाई केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेतून असावेत असा निर्णयय मंत्रीमंडळाने जानेवारी 2022 मध्ये घेतला आहे. त्यानुसार कामगार संख्या दहा पेक्षा कमी असलेल्या दुकाने व आस्थापना यांना मराठी भाषेतून नामफलक लावण्याचे आदेश जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे केले होते. मात्र, या आदेशाचे पालन मागील महिन्यापासून दुकान व आस्थापना मालकांकडून टाळाटाळ केली जात होती. त्यानुसार या दुकानांवर कारवाईचे कामगार आयुक्त कार्यालयाकडून सुरू केले असून त्यानुसार जिल्ह्यातील 35 दुकान व आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतून नामफलक लावा!

तपासणीतून अनेक दुकान व आस्थापना यांना कामगार आयुक्त कार्यालयाकडून दुकाने व आस्थापनांना नोटीसा देण्यात आल्या. त्यांनी मराठीतून नामफलक लावले. पण ज्यांनी मराठीतून नामफलक अद्याप लावलेले नाही अशा दुकानदार तसेच आस्थापना मालकांनी त्वरीत नामफलक मराठीतून लावून घ्यावे असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त चं.ना. बिरार यांनी केले आहे.

34 हजार रुपये न्यायालयाने ठोठावला दंड

मराठीतून दुकानांवर अथवा आस्थापनांवर नामफलक न लावणार्‍या मालकांकडून 34 हजाराचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. यात काही खटले प्रलंबीत आहे. मार्च 2022 पासून सुरू केलेल्या मोहिमेत 406 दुकाने अस्थापनांची तपासणी केली असून त्यात मराठीतून नामफलक नसलेले आढळून आलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या