Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशपेगासस हेरगिरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल

पेगासस हेरगिरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल

दिल्ली | Delhi

२०१७ मध्ये झालेल्या १५ हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र कराराच्या वेळी भारताने इस्रायलकडून पेगॅसस स्पायवेअर खरेदी केले, असा दावा अमेरिकेतील एका वृत्तपत्राने केल्यानंतर देशात खळबळ माजली आहे.

- Advertisement -

दरम्यान पेगासस हेरगिरीप्रकरणी (Pegasus snooping) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आता नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. एम. एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे.

श्रीरामपूर पोलीस दलात ऑडिओ बॉम्ब

या याचिकेत बातमीची दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच सन २०१७ मध्ये इस्राईलसोबत (Israel) केलेल्या संरक्षण कराराच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

काय म्हटलंय त्या वृत्तपत्रात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै २०१७ मध्ये इस्राईल दौऱ्यावर गेले तेव्हा भारताने इस्राईलसोबत २ बिलियनचा शस्त्रास्त्र करार केला. यात क्षेपणास्त्र यंत्रणेसह पेगॅसस स्पायवेअरचा देखील समावेश असल्याचं न्यू यार्क टाईम्सच्या अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे इस्राईलला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवर विशिष्ट पॅलेस्टाईन धोरण असूनही ही भेट झाली होती.

या इस्राईल दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात २ बिलियनच्या शस्त्रस्त्र खरेदीचा करार झाला. यातच क्षेपणास्त्र यंत्रणेसोबत पेगॅससचा समावेश होता. यानंतर नेत्यान्याहू यांनी जून २०१९ मध्ये भारत दौरा केला. यानंतर भारताने संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत पॅलेस्टाईन मानवाधिकार संघटनेच्या मान्यतेवर इस्राईलच्या बाजूने मतदान केलं. आतापर्यंत भारत किंवा इस्राईलपैकी कोणीही पेगॅसस खरेदीला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?

पेगासस (Pegasus) म्हणजे काय?

पेगासस हा स्पायवेअरचा एक प्रकार आहे. हे लोकांच्या फोनद्वारे त्यांची हेरगिरी करते. पीबीएनएसच्या अहवालानुसार, पेगासस एक लिंक पाठवते आणि जर वापरकर्त्याने त्या लिंकवर क्लिक केले तर त्याच्या फोनवर मालवेअर किंवा देखरेखीसाठी परवानगी असलेला कोड इन्स्टॉल होतो. असे सांगितले जात आहे की मालवेअरच्या नवीन आवृत्तीसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करणे आवश्यक नाही. एकदा पेगासस इन्स्टॉल झाल्यानंतर, हल्लेखोराकडे वापरकर्त्याच्या फोनची संपूर्ण माहिती असते.

PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

एनएसओ ग्रुप काय आहे?

एनएसओ ग्रुप ही एक सायबर सिक्युरिटी कंपनी आहे जी ‘हेरगिरी तंत्रज्ञान’ मध्ये स्पेशालिस्ट आहे आणि जगभरातील सरकारे आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना गुन्हे आणि दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी मदत करण्याचा दावा करते. एनएसओ ग्रुप 40 देशांमध्ये आपल्या ग्राहकांना 60 गुप्तचर, लष्करी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून आपल्या ग्राहकांचे वर्णन करते.

तथापि, क्लायंटच्या गोपनीयतेचा हवाला देत हे त्यापैकी कोणाचीही ओळख सांगत नाही. कॅलिफोर्नियामध्ये व्हॉट्सअॅपने पूर्वी केलेल्या खटल्याला उत्तर देताना एनएसओ ग्रुपने म्हटले होते की पेगाससचा वापर फक्त सार्वभौम सरकार किंवा इतर देशांतील त्यांच्या संस्थांद्वारे केला जातो.

PHOTO : अल्लू अर्जुनची रियल लाईफ ‘श्रीवल्ली’ पाहिलीत का?

- Advertisment -

ताज्या बातम्या