Friday, April 26, 2024
Homeनाशिकबालरोगतज्ज्ञ डॉ. भांडारकर आयएमएच्या राज्य सहसचिवपदी बिनविरोध

बालरोगतज्ज्ञ डॉ. भांडारकर आयएमएच्या राज्य सहसचिवपदी बिनविरोध

नाशिकचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये जॉइन्ट सेक्रेटरी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

डॉ. भांडारकर हे नाशिक मध्ये साफल्य व गंगा हॉस्पिटलचे संस्थापक डायरेक्टर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून करोना काळात त्यांनी विशेष सामाजिक योगदान त्यांनी दिले.

- Advertisement -

तसेच ते इतर विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ते इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन राष्ट्रीय स्पोर्ट्स कार्यकारिणीच्या को-चेअरमन पदी विराजमान आहेत.

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चे कार्यकारिणी सदस्यदेखील ते आहेत. नाशिक मध्ये नुकत्याच झालेल्या डॉक्टरांच्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा आयोजनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती व मार्गदर्शन केले होते. या स्पर्धामध्ये भारतातील सुमारे 1000 हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते.

त्यांच्या या निवडीबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ. हेमंत सोनानिस, उपाध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, तसेच कार्यकारिणी सदस्य डॉ. नीलेश निकम, डॉ. समीर पवार, डॉ. पंकज भदाणे व इतर सर्व सभासदांकडून तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे खेळाडू, पदाधिकारी अणि विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच मित्रवर्ग यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या