Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदेवळाली रेल्वे स्टेशनवर साकारतोय पादचारी पूल

देवळाली रेल्वे स्टेशनवर साकारतोय पादचारी पूल

देवळाली कॅम्प । Deolali

ब्रिटीश कालीन रेल्वे स्टेशन असलेल्या देवळाली येथील पादचारी पूल 100 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा झाला असून…

- Advertisement -

त्याची मजबुतीकरणाची क्षमता संपत आल्याने या ठिकाणी 2.50 कोटी रुपये खर्च करून नवा प्रशस्त पुलाची उभारणी करण्यात येत आहे.

काल या कामाची खा. हेमंत गोडसेंसह रेल्वे अधिकार्‍यांनी पाहणी केली.

ब्रिटिशांनी आरोग्यासाठी असलेले योग्य वातावरण लक्षात घेऊन लष्करी आस्थपनासाठी मुंबईनंतर देवळालीत रेल्वे स्टेशनची निर्मिती केली.

तेव्हा सिंगल लाइन टाकण्यात आली होती. कालांतराने दुसरी लाईन टाकण्यात आली. त्यावेळी बनविलेला पादचारी पूल जीर्ण झाल्याने व त्याचे आयुष्यमान संपत आल्याने, रेल्वे विभागाने जुलै 2019 मध्ये नव्या पादचारी पुलाला मान्यता देत प्रत्यशात काम देखील सुरू केले. मात्र मार्च 2020 पासून करोनाच्या काळात या कामाचा वेग मंदावला होता.

खा गोडसे यांच्या सततच्या पाठपुरावाने कामाने गती घेतली असून येत्या डिसेंबर 2020 पर्यंत पूल पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले. काल खा. गोडसे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत अधिकारीवर्गाला काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

यावेळी स्टेशन प्रबंधक मनोज सिन्हा, वरीष्ठ अभियंता एस.सी. शर्मा, मुख्य आरोग्य निरीक्षक अनुज सिंग, अधिकारी पुरुषोत्तम लाल, मुख्य वाणिज्य अधिकारी दिनकर निमसे, सी.आर. शिंदे, अजय खंडेलवाल आदी उपस्थित होते.

वर्षभरापासून नव्या पादचारी पुलाचे काम सुरू असून 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पुलाची लांबी 50 मीटर व रुंदी 3.66 मीटर असून तीन ठिकाणी तो उतरविण्यासाठी जिने राहणार आहेत.

शिवाय रेल्वे वसाहत व नागरी विभाग यांना देखील या पुलावरून जाण्यासाठी सोय करण्यात आली आहे. पुलाचा खर्च सुमारे 2.50 कोटीच्या दरम्यान आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या