Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदहिवड येथे विजेच्या धक्क्याने मोराचा मृत्यू

दहिवड येथे विजेच्या धक्क्याने मोराचा मृत्यू

दहिवड । Dahiwad

देवळा तालुक्यातील दहिवड येथील शेतकरी लोटण अहिरराव यांच्या शेतातील विजरोहित्रावर बसलेल्या मोराला विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

कुत्र्यांच्या भीतीने मोराने वीज रोहित्रावर उडी घेतली परंतु यावेळी वीज प्रवाह चालू असल्याने मोरास जोरदार विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती प्रहार शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी वीज वितरक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली.

वीज कंपनीचे कर्मचारी शामकांत अहिरे, दीपक पवार यांनी त्वरित वीज वाहिनी बंद करून मोराला मृत्यूवस्थेत वीज रोहित्राच्या खाली उतरविले.

सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनरक्षक एम एम साळुंके, वनसेवक आर आर साळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या