Friday, April 26, 2024
Homeनाशिकअंबड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

अंबड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या ( Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्यात ( Ambad Police Station )शांतता समितीची बैठक (Peace Committee Meeting )वपोनी भगीरथ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

- Advertisement -

यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक नंदन बगाडे,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर उपस्थित होते. वपोनी भगीरथ देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन सूचना देतांना त्यांनी सांगितले कि,मंडप हा वॉटर प्रुफ,फायर प्रुफ करून घ्यावा. स्टेज च्या सुरक्षेची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची असणार आहे.मंडप किंवा स्टेजमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व ( दि. १४ ) रात्री १० वाजेपर्यंत स्टेज अथवा मंडप काढून घ्यावा.

इतर धर्मियांच्या भावना दुखावतील तसेच आक्षेपार्ह ठरेल अशा विषयांवर देखावा किंवा आरास करू नये. उत्सव काळात कुणाकडूनही सक्तीने किंवा जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये. मिरवणुकीत दांडपट्टे,तलवारी आदी खेळांसह हत्ती घोडे,उंट सारखे पाळीव प्राण्यांना परवानगी देण्यात येणार नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते ६ वाजेच्या काळात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच ध्वनिक्षेपकाचा किंवा वाद्याचा आवाज ५० डेसिबल पेक्षा जास्त नसावा व डी जे वाद्य लावण्यास मनाई असल्याचे मार्गदर्शक सूचना देतांना वपोनि देशमुख यांनी सांगितले.

यावेळी संतोष सोनपसारे,अनिल आठवले,सुनील जगताप,प्रशांत जाधव,देवेंद्र पाटील,बाळासाहेब घुगे,प्रशांत खरात,राहुल राऊत,मुकेश शेवाळे,विशाल डोखे,आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या