Thursday, April 25, 2024
Homeनाशिक'या' पतसंस्थेला झाला कोटींचा नफा

‘या’ पतसंस्थेला झाला कोटींचा नफा

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील नायगाव (Naigaon) येथील सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या एस. एस. के. धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेला (S. S. K. Dhanalakshmi Nagari Sahakari Patsanstha) या आर्थिक वर्षात 1 कोटी 6 लाख रुपयांचा विक्रमी नफा (Profit) झाल्याची माहिती चेअरमन संग्राम कातकाडे (Chairman Sangram Katkade) यांनी दिली.

- Advertisement -

संस्थेच्या सभासदांची संख्या 10 हजार 602 असून वसूल भाग भांडवल 1 कोटी 65 लाख असून एकूण निधी (fund) 11 कोटी 4 लाखांवर पोहचला आहे. संस्थेकडे 89 कोटी 26 लाखांच्या ठेवी असून संस्थेने 66 कोटी 30 लाखांचे कर्जवाटप (Loan disbursement) केलआहे. त्यापैकी 70 टक्के कर्जवाटप फक्त सोने तारणावर (Gold mortgage) केले आहे. संस्थेने 33 कोटी 66 लाखांची गुंतवणूक केली असून संस्थेचे खेळते भागभांडवल 105 कोटी 38 लाख आहे. संस्थेला 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण ढोबळ नफा 1 कोटी 48 लाख झाला आहे.

सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा 1 कोटी 6 लाख झाला आहे. सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, संचालक व सेवकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे ते म्हणाले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन प्रकाश जेजुरकर, संचालक ज्ञानेश्वर लहाने, प्रभाकर जेजुरकर, साहेबराव बोडके, यादव कापडी, संजय कुटे, कुणाल कातकाडे, भिमराव गायकवाड, संचालिका नर्मदा पानसरे, साधना फुलसुंदर यांच्यासह सभासद, ठेवीदार उपस्थित होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल भाबड यांनी आभार मानले.

कोअर बँकिंगसह विविध सुविधा

संस्था कोअर बँकिंग असून संस्थेत आर. टी. जी. एस./एन. ई. एफ. टी./ आय. एम. पी. एस., होस्ट टू होस्ट, एस. एम. एस., क्यू आर कोड सुविधा सुरु आहे. सामाजिक उपक्रम म्हणून नायगाव परिसरातील विद्यार्थ्यांकरिता संस्थेची अद्ययावत अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या