Friday, April 26, 2024
Homeनगरग्रामसुरक्षा दलाची गस्त सुरू होताच सोनई परिसरातून चोरटे झाले गायब

ग्रामसुरक्षा दलाची गस्त सुरू होताच सोनई परिसरातून चोरटे झाले गायब

सोनई (वार्ताहर) – सोनईत चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणेबरोबर आता 120 युवकांचा फौजफाटा रात्रीची गस्त घालू लागला आहे. त्याचबरोबर मुळा साखर कारखाना व मुळा एज्युकेशनचे सुरक्षा कर्मचारीही परिसरात गस्त घालणार आहेत. युवकांनी गस्त सुरू करताच चोरटे गायब झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, सोनई ग्रामपंचायतीच्या सभागृहात पत्रकार विनायक दरंदले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 100 युवकांचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकाळे, माजी सरपंच दादासाहेब वैरागर, सामाजिक कार्यकर्ते संतोष चपळे, रितेश गुंदेचा, सुनील तागड, अक्षय म्हसे, पोलीस कर्मचारी बाबा वाघमोडे उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सचीन पवार यांनी केले.

- Advertisement -

बैठकीत युवकांनी रात्री गस्त घालत असताना येत असलेल्या अडचणी विशद केल्या. सहायक पोलीस निरीक्षक कर्पे यांनी आवश्यक सूचना करून गावाच्या हितासाठी युवकांनी दिलेली साथ कौतुकास्पद असल्याचे सांगितले. शैलेश दरंदले यांनी आभार मानले.

कारखाना सुरक्षा कर्मचार्‍यांचीही गस्त

सोनई गाव मोठे असून सर्व गल्ली, वसाहत, गावात येणारे रस्ते व्यापारी पेठ आणि खरवंडी, घोडेगाव, राहुरी, हनुमानवाडी, बेल्हेकरवाडी, श्रीरामवाडी आदी सर्वच रस्त्यांवर बंदोबस्त व नाकेबंदी आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर उदयन गडाख यांनी मुळा कारखाना व एज्युकेशनच्या सुरक्षा कर्मचार्‍यांचा बंदोबस्तही गावासाठी तैनात केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या