Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्हा रूग्णालयात रूग्णाची आत्महत्या

जिल्हा रूग्णालयात रूग्णाची आत्महत्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या 26 वर्षीय रूग्णाने स्वच्छतागृहात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.12) सायंकाळी घडली.

- Advertisement -

सचिन दादाजी सोनवणे (26, रा. मुसळगाव, ता. सिन्नर) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. पोट दुखी व उलट्यांचा त्रास होत असल्याने आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यास उपचारांसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुख्य इमारतीतील पुरूष कक्षामध्ये त्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान सायंकाळच्या सुमारास तेथील स्वच्छतागृहात त्याने गळफास लावून आत्महत्या केली. दुसरा रूग्ण तेथे गेले असता ही बाब निदर्शनास आली. त्याने परिचारीकांच्या हे निदर्शनास आणल्यानंतर सर्वांनी धाव घेत त्यास खाली उतरवले. तत्पुर्वी त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सचिन सोनवणे या युवकास उलट्या होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर औषधोपचार केल्याने तब्येत स्थिर झाली होती. त्यानंतर त्यास डिस्चार्ज देण्यात आला. मात्र घरी जाण्याआधी त्याने स्वच्छता गृहात आत्महत्या केल्याचे आढळून आले.

– डॉ. निखील सैंदाने, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक

- Advertisment -

ताज्या बातम्या